Assam Jails HIV Cases
esakal
आसाममध्ये गेल्या चार महिन्यांत ३१ तुरुंगांमध्ये केलेल्या तपासणीत तब्बल २२६ कैदी HIV पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती समोर आली आहे. यातील २०२ जणांवर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) सुरू असल्याचं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. या प्रकरणावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. तुरुंगातील एका कैद्याला HIVची लागण झाल्याचं आपल्याला सांगण्यात आलं असून, सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.