आसाम : कारबी अँगलाँगमध्ये १० कोटींचं हेरॉईन जप्त ; दोघांना अटक

Drug seized
Drug seizedANI

गुवाहाटी : आसामच्या (Assam) कारबी अँगलाँगमध्ये (Karbi Anglong) पोलिसांनी अमली पदार्थ तस्करांवर मोठी कारवाई करत तब्बल १० कोटी रुपयांचं हेरॉईन (1.6 kg heroin seized) जप्त केले. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या. मणीपूर येथील आमीर हुसेन (२२) आणि सलाऊ रेहमान (३२) अशी अटक केलेल्या (Two culprit arrested) आरोपींची नावे आहेत. बोकाजन येथील एसबीआयच्या खटखटी समोर कारबी अँगलॉंग जिल्हा पोलिसांनी चेकपोस्ट लावला होता. सीआरपीएफच्या (CRPF) कर्मचाऱ्यांनी सोमवारी पहाटे अमली पदार्थ घेवून जाणारा ट्रक अडवला त्यानंतर पोलिसांनी ११५ सोपबॉक्समधून १.६ किलोग्रॅम हेरॉईन जप्त केले. असं वृत्त इंडिया टूडेनं दिलं आहे. (Assam karbi anglong police arrested two culprits and seized 1.6 kg heroin)

Drug seized
पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्तींना धमक्या

"मणीपूर येथून येणाऱ्या ट्रकमध्ये १.६ किलो हेरॉइन तस्करांनी ट्रकच्या एका कॅबिनमध्ये लपवलं होतं. या अमली पदार्थाची किंमत जवळपास १० कोटी रुपये आहे. हेरॉईन जप्त केले असून दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थाचा माल बोकाजन परिसरात पोहचवण्याचा तस्करांचा प्लॅन असावा. " अशी माहिती बोकाजनचे एसडीपीओ जॉन दास यांनी दिली आहे.

तसंच दास पुढे म्हणालेत, ट्रकचा ड्रायव्हर आरोपी आमीर हुसेनला डिलीव्हरी पॉईंट विचारण्यासाठी बोकाजन परिसरात नेले असता त्याने पोलिसांना ढकलून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याच्या पायावर दोन गोळ्या झाडल्या त्यानंतर तो जखमी झाला. त्याला त्वरीत उपचारासाठी बोकाजनच्या सीएचसी येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी DMC&H दिपू येथे पाठवण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com