esakal | Corona double variant : महिलेला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग; देशातील पहिलाच रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

महिलेला एकाच वेळी दोन व्हेरिएंटचा संसर्ग; देशातील पहिलाच रुग्ण

sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशावर सध्या कोरोनाच्या corona तिसऱ्या लाटेचं संकट घोंघावत आहे. यामध्येच आता भर म्हणून कोविडच्या डबल अटॅकचा धोका निर्माण झाला आहे. आसाममधील एका महिला डॉक्टरमध्ये कोविडचा डबल व्हेरिएंट आढळून आला आहे. या डॉक्टरच्या शरीरात एकाच वेळी डेल्टा आणि अल्फा हे दोन कोरोना व्हेरिएंट असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे डबल व्हेरिएंट आढळून आलेला हा देशातील पहिला रुग्ण आहे. (assam-lady-doctor-infected-by-double-variants-at-the-same-time-may-be-first-case-in-india)

आसाममध्ये राहणाऱ्या एका महिला डॉक्टरने कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले होते. मात्र, तरीदेखील त्यांच्यात अल्फा व डेल्टा हे दोन व्हेरिएंट आढळून आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलं आहे.

हेही वाचा: कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती; महिन्याला 69 हजार पगार

'लाइव्ह मिंट'नुसार, आसाममधील संबंधित महिलेच्या शरीरात अल्फा आणि डेल्टा हे दोन्ही व्हेरिएंट आहेत. तसंच डबल व्हेरिएंट असलेला हा देशातील पहिलाच रुग्ण आहे, अशी माहिती आसामच्या डिब्रुगढ जिल्ह्यातील प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्राचे डॉ. विश्वज्योती बोरकाकोटी यांनी दिली.

"कोरोनाचे डबल व्हेरिएंट आढळून आलेल्या महिला डॉक्टराच्या पतीला प्रथम कोरोना झाला होता. त्यामुळे या डॉक्टर महिलेनेदेखील स्वत: ची कोरोना चाचणी केली. त्यावेळी त्यांच्याच अल्फा आणि डेल्टा दोन्ही व्हेरिएंट असल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे हा रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी पुन्हा दुसरी टेस्ट केली", असं डॉ. बोरकाकोटी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "संबंधित महिला डॉक्टरमध्ये कोरोनाचे सौम्य लक्षणे आहेत. तसंच त्यांची प्रकृतीदेखील स्थिर आहे. त्यामुळे सध्या त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं नसून घरीच उपचार सुरु आहेत."

दरम्यान, यापूर्वी बेल्जियममधील आल्स्तो शहरात एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या शरीरात अल्फा आणि बीटा हे दोन्ही व्हेरिएंट एकाच वेळी आढळून आले होते.

loading image