esakal | SSC Constable Vacancy 2021: कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती; महिन्याला 69 हजार पगार
sakal

बोलून बातमी शोधा

Job News

कॉन्स्टेबल पदासाठी मेगा भरती; महिन्याला 69 हजार पगार

sakal_logo
By
शर्वरी जोशी

SSC Constable (GD) Recruitment 2021: एसएससी (SSC) जीडी कॉन्स्टेबल पदांवर नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी कर्मचारी निवड आयोगाने (Staff Selection Commission) SSC GD Constable Recruitment 2021 नुकतंच नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. त्यानुसार, कॉन्स्टेबल (जीडी) पदासाठी २५ हजार जागा रिक्त असून उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी ६९ हजारांपर्यंत पे-स्किल मिळणार आहे. (ssc-gd-constable-recruitment-2021-for-10th-pass-job-vacancy-in-bsf-cisf)

SSC ने ssc.nic.in या संकेतस्थळावर नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. नुकतंच यासंदर्भातील अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. या संकेतस्थळावर जाऊन पात्र उमेदवारांना सीमा सुरक्षा (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF), भारत तिबेट सीमा पोलीस (ITBP), सशस्त्र सीमा बल ( SSB),नॅशनल इंस्टीगेशन एजन्सी (NIA), सचिवालय सुरक्षा बल (SSF)आणि असम राइफल्स (जनरल ड्यूटी) च्या भरतीसाठी अर्ज करता येऊ शकतो. विशेष म्हणजे पुरुषांसोबत महिलादेखील या पदांसाठी अर्ज करु शकतात.

पदाचं नाव - कॉन्स्टेबल जीडी

पदांची संख्या - २५ हजार २७१

पे -स्केल - २१ हजार ७०० पासून ६९ हजार १०० रुपयांपर्यंत प्रतिमहिना ( अतिरिक्त भत्तेदेखील)

नेमकी कुठे आहे व्हेकन्सी?

बीएसएफ- ६ हजार ४१३ ( पुरुष), १हजार १३२ (महिला)

सीआयएसएफ कॉन्स्टेबल व्हेकन्सी - ७ हजार ६१० (पुरुष), ८५४(महिला)

एसएसबी कॉन्स्टेबल व्हेकन्सी - ३ हजार ८०६ (पुरुष)

आयटीबीपी कॉन्स्टेबल व्हेकन्सी- १ हजार २१६ (पुरुष), २१५ (महिला)

असम राइफल्स - ३हजार १८५ (पुरुष), ६०० (महिला)

एसएसएफ कॉन्स्टेबल व्हेकन्सी - १९४ (पुरुष), ४६ (महिला)

हेही वाचा: कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या शिक्षिकेवर आली कचरा उचलण्याची वेळ

पात्रता -

दहावी पास उमेदवार SSC GD Constable Recruitment 2021 या भरतीसाठी अर्ज करु शकतात. उमेदवार १८ ते २३ या वयोगटातील असावा.

अर्ज कसा करावा?

SSC GD Constable Recruitment 2021 या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना प्रथम ssc.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येईल. १७ जुलै २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत उमेदवार अर्ज करु शकतात. जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करताना १०० रुपयांचं शुल्क भरावं लागेल.

निवडप्रक्रिया -

उमेदवारांची निवड ही प्रथम लेखी परीक्षेच्या स्वरुपात होईल. ही परिक्षा संगणक आधारित चाचणी असेल. त्यानंतर फिजिकल स्टॅडर्ड टेस्ट, आणि मेडिकल टेस्टच्या आधारावर आहे.

loading image