पुरावे का मागितले? आसाम करणार तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरावे का मागितले? आसाम करणार तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

पुरावे का मागितले? आसाम करणार तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल

गुवाहाटी: सर्जिकल स्ट्राईक हा मुद्दा आता पुन्हा एकदा चर्चेला आला असून त्यावर राजकारण घडताना पहायला मिळत आहे. पाच राज्यांमधील निवडणुकांच्या तोंडावरच हा मुद्दा चर्चेत असून आता यासंदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) चर्चेत आले होते. त्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) देखील यासंदर्भातच चर्चेला आले असून त्यांनीही सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. यानंतर आता त्यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. (Surgical Strike)

हेही वाचा: "खोटी आश्वासनं पाहिजे असतील तर मोदी, केजरीवालांना ऐका"

हेही वाचा: 'संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आहेत का?'

अनेक भाजप समर्थकांकडून तक्रार मिळाल्यानंतर आता आसाममधील पोलिसांकडून (Assam Police) तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनीही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणाऱ्या विधानाचं समर्थन केलं होतं. तसेच पुरावे मागण्यात गैर काय? असं वक्तव्य केलं होतं. मात्र, भारतीय सैन्याला याप्रकारे पुरावे मागणाऱ्या विधानामुळे भारतविरोधी भावनांना खतपाणी घातलं जात असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. (Telangana CM)

पुलवामा हल्ल्याच्या तिसर्‍या वर्षपूर्तीच्या पूर्वसंध्येलाच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारवर तोफ डागली आहे. ते म्हणालेत की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितला. यामध्ये काही चुकीचं नाही. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, केवळ राहुल गांधींनाच नाही, तर मलाही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावेही पाहायचे आहेत.

हेही वाचा: युट्यूब अकाऊंट बंद; संसद टीव्हीचा गंभीर आरोप, म्हणाले..

राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले यात काहीही गैर नाही. काय चुकलं होतं. असे पुरावे मलाही हवे आहेत. लोकांच्या मनात याबाबत आशंका आहे हे भारत सरकारला दाखवू द्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणाले होते. पुढे त्यांनी भाजप पक्षावर खोटा अजेंडा रेटल्याचा आरोपही केला. लोकशाहीत तुम्ही राजा किंवा सम्राट नसता, असंही विधान करत ते म्हणाले की, भाजप सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय वापर करत आहे. लष्कर सीमेवर लढत आहे. जर कोणी मरत असेल तर ते लष्कराचे जवान आहेत, आणि त्यांच्या मरणाचे श्रेय भाजपला दिले पाहिजे, असंही ते म्हणाले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागितल्याबद्दल राहुल गांधींवर हल्ला केला होता. त्यांच्यावर वैयक्तिक टीका केल्यामुळे सर्मा यांनाही टीकेला सामोरी जावे लागले होते. तुम्ही राजीव गांधींचेच पुत्र आहात, याचा काय पुरावा? या आशयाचं विधान करत त्यांनी राहुल गांधींना सर्जीकल स्ट्राईकचे पुरावे मागू नका, असं म्हटलं होतं.

Web Title: Assam Police To File A Case Against Telangana Cm For Questioning The Army By Demanding Proof For Surgical Strike

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top