"खोटी आश्वासनं पाहिजे असतील तर मोदी, केजरीवालांना ऐका"

राहुल गांधींनी आज पंजाबच्या पटियालामध्ये प्रचारसभेला संबोधित केलं.
Rahul Gandhi
Rahul Gandhi file Photo

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (Assembly Elections 2022) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंजाबमध्ये (Punjab) 20 फेब्रुवारीला मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस, आप आणि भाजपमध्ये मुख्य लढत असून, तिन्ही पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही (Rahul Gandhi) आज प्रचार मैदानात उतरले आहेत. आज पटियालामध्ये राहुल गांधींनी प्रचार सभेला संबोधित केलं. यावेळी त्यानी नरेंद्र मोदी (Narendra Modi), अरविंद केजरीवाल आणि सुखबीर सिंग बादल यांच्यावर निशाणा साधला.

Rahul Gandhi
लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; जेलमध्ये रवानगी

राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना, सर्व नेते निवडणुकीच्या काळात खोटी आश्वासनं देत असल्याचं सांगितलं. त्यावर ते म्हणाले की, मी खोटी आश्वासनं देणार नाही. तुम्हाला खोटी आश्वासनं ऐकायची असतील तर मोदीजी, बादलजी आणि केजरीवालजींना ऐका. मला फक्त सत्य बोलायला शिकवलं गेलंय असं म्हणत राहुल गांधींनी एका दगडात तीन पक्षी मारले. काँग्रेस नेते राहुल गांधींनी पटियालातील राजपुरमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं.

Rahul Gandhi
भारत सरकारला मोठा दणका! संसद टीव्हीचे युट्यूब अकाऊंट गूगलने केले बंद

दरम्यान, पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी केली असून, या निवडणुकीत काँग्रेसला जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शेतकरी आंदोलनमुळे पंजाबचा बहुतांश मतदार भाजपपासून दुरावल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तर आम आदमी पक्ष देखील मोठ्या प्रमाणात तयारी करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे पंजाबच्या विधानसभेवर कुणाचा झेंडा फडकणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com