इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागं 'हा' तांत्रिक बिघाड; सरकारी समितीला सापडलं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ola-scooter-fire_EV Bike
इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागं 'हा' तांत्रिक बिघाड; सरकारी समितीला सापडलं कारण

इलेक्ट्रिक बाईक्स पेटण्यामागं 'हा' तांत्रिक बिघाड; सरकारी समितीला सापडलं कारण

नवी दिल्ली : देशात आता इलेक्ट्रिक वाहनांची चर्चा सुरु व्हायला लागली आहे. लोक मोठ्या प्रमाणावर प्रदुषणविरहित वाहनांचा हा पर्याय वापरताना दिसत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून इलेक्ट्रिक बाईक्सना आग लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं एका विशेष समितीची स्थापना केली होती. या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला असून यामध्ये सर्व मॅन्युफॅक्चर्सच्या बॅटरींमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. (Govt Committee finds almost all EV makers at fault over fire incidents in preliminary report)

हेही वाचा: युक्रेनचं राहू द्या, मोदींनी महागाईवर बोलावं, राऊतांचा टोला

वारंवार आगीच्या घटना समोर येत असल्यानं गेल्या महिन्यात सरकारनं या घटनांच्या चौकशीसाठी विशेष समिती नेमली होती. Okinawa Autotech, Boom Motor, Pure EV, Jitendra EV, and Ola Electric या कंपन्यांच्या स्कूटर्सना आग लागल्याचा घटना घडल्या होत्या. या सर्व आगीच्या घटनांमागे जवळपास या सर्व कंपन्यांच्या बॅटरी सेलमध्ये तसेच या बॅटरीजच्या डिझाईनमध्ये बिघाड असल्याचं प्राथमिक तपासणीत समोर आलं आहे.

ओलानं परत बोलावल्या स्कूटर्स

दरम्यान, इलेक्ट्रिक व्हेईकल्स बनवणाऱ्या कंपन्यानी आता स्वतंत्रपणे बॅटरीमधील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरना आग लागल्याच्या घटना समोर आल्यानंतर या कंपनीनं आपल्या १४४१ स्कूटर परत बोलावल्या होत्या. या स्कूटरमधील बॅटरीचं आरोग्य तापासण्यासाठी तसेच या विशिष्ट बॅचच्या स्कूटर्सनाच हा प्रॉब्लेम का येतोय हे त्यांना तपासायचं होतं.

इन्शूरन्स बंधनकारक करा - दिल्ली हायकोर्ट

दिल्ली हायकोर्टानं देखील या आठवड्यात केंद्र सरकारला आणि दिल्ली सरकारला यासंदर्भात नोटीस बजावली होती. तसेच इलेक्ट्रिक बाईक्स आणि स्कूटर्स विकताना इन्शूनरन्स बंधनकारक करण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील ईव्ही मेकर्सना गेल्या महिन्यात इशारा दिला होता की, जर कोणत्याही कंपनीनं इलेक्ट्रिक वाहनं बनवताना निष्काळजीपणा केल्याचं आढळल्यास त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सर्व बिघाड असलेली वाहनं परत बोलवावी लागतील.

Web Title: Govt Committee Finds Almost All Ev Makers At Fault Over Fire Incidents In Preliminary Report

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top