
गुवाहाटी : गेल्या काही वर्षांत आसाममध्ये गिधाडांची संख्या वेगाने घटत आहे. मृत प्राण्यांचे रसायनयुक्त अवशेष खाणे गिधाडांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे, निसर्गाचे स्वच्छतादूत म्हटले जाणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी स्थानिक पातळीवर अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. जैवसाखळीत महत्त्वाचे स्थान असलेल्या गिधाडांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.