esakal | भाजपसाठी पाच राज्यांची निवडणूक आव्हानात्मक; ओपिनियन पोलचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

assembly election 2021

पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडुसह (Tamilnadu) देशातील पाच राज्यांमध्ये (Assembly Election 2021) विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. 

भाजपसाठी पाच राज्यांची निवडणूक आव्हानात्मक; ओपिनियन पोलचा अंदाज

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - पश्चिम बंगाल (West Bengal), तामिळनाडुसह (Tamilnadu) देशातील पाच राज्यांमध्ये (Assembly Election 2021) विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टाइम्स नाऊ आणि सी वोटरने ओपिनियन पोल जारी केला आहे. यामध्ये पुद्दुचेरीत (Puducherry) एनडीएचं सरकार येईल असा अंदाज वर्तवला आहे. तर केरळमध्ये (Kerala) पुन्हा एलडीएफ बाजी मारण्याची शक्यता व्यक्त केली आहे. सर्व्हेनुसार राज्यातील 140 जागांपैकी डाव्यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला 82 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर काँग्रेसप्रणित यूडीएफला 56 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ओपिनयन पोलमध्ये भाजपला केरळमध्ये धक्का बसू शकतो असं म्हटलं आहे. भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. तर पुद्दुचेरीत काँग्रेसला डीएमकेसोबत आघाडीचा फायदा होत नसल्याचं दिसत आहेत.

ओपिनियन पोलमध्ये पुद्दुचेरीच्या 30 पैकी 16 ते 20 जागांवर एनडीए बाजी मारण्याची शक्यता व्यक्त केली आहे. तर युपीएला 13 जागा मिळू शकतील. पुद्दुचेरीत 6 एप्रिलला मतदान होणार आहे. तर पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात 27 मार्च ते 29 एप्रिल या कालावधीत मतदान होणार आहे. तामिळनाडु आणि केरळमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. आसाममध्ये 27 मार्च, एक एप्रिल आणि 6 एप्रिलला तीन टप्प्यात मतदान होईल. सर्व राज्याची मतमोजणी 2 मे रोजी होईल.

हे वाचा - पश्चिम बंगालमध्ये ममतांना भाजपचा 'पंच'; निवडणुकीआधीची मोठी खेळी

केरळमध्ये पुन्हा पी विजयन
केरळचे मुख्यमंत्री म्हणून पी विजयन यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. राज्यात 38 टक्के लोकांनी त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बघायला आवडेल असं म्हटलं आहे. तर 28 टक्के लोकांनी ओमन चांडी यांच्या नावाला पसंती दिली आहे. आवडत्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत एम रामचंद्रन यांना अडीच टक्के, केके शैलजा यांनी 5.9 टक्के तर रमेश चेन्निथला यांना 4.2 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. 

ओपिनियन पोलनुसार केरळमध्ये जवळपास 56 टक्के लोक पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी सर्वात योग्य उमेदवार असल्याचं मानतात. तर सीवोटरचे संस्थापक आणि चीफ एडिटर यशवंत देशमुख यांनी सांगितलं की, केरळ, तामिळनाडु आणि पंजाब असी राज्ये आहेत जी गेल्या सहा वर्षांपासून मोदी लाटेच्या विरोधात मतं देत आहेत. 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तामिळनाडुत पुन्हा युपीए
तामिळनाडुमध्ये मुख्यमंत्री म्हणून डीएमके प्रमुख एमके स्टॅलिन यांना पहिली पसंती मिळाली आहे. इथेही 38 टक्के लोकांनी स्टॅलिन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.  राज्यात एआयडीएमकेसह भाजपला धक्का बसू शकतो. राज्यातील 234 जागांपैकी युपीएला 158 जागा मिळण्याची शक्यता आहे तर एआयडीएमके आणि भाजपच्या युतीला 65 जागा मिळतील असा अंदाज आहे. 

हे वाचा - Puducherry Opinion Poll: काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य जाणार ?

आसाममध्ये भाजपला गूड न्यूज तर युपीएला संधी
आसाममध्ये भाजपसाठी चांगलं वातावरण दिसत आहे. राज्यात पुन्हा एकदा एनडीए सरकार येऊ शकतं. इथं 126 पैकी 67 जागी भाजप जिंकण्याची शक्यता असून युपीएसुद्धा आधीपेक्षा यावेळी मुसंडी मारू शकते. 39 वरून 57 जागांपर्यंत झेप घेण्याची शक्यता आहे. 
 

loading image
go to top