Puducherry Opinion Poll: काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य जाणार ?

puducherry.jpg
puducherry.jpg

नवी दिल्ली- Puducherry Assembly Election 2021 पुद्दुचेरी विधानसभेसाठी येत्या 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. अनेक पक्षांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच पुद्दुचेरीत राजकीय नाट्य रंगल्याचे संपूर्ण देशाने पाहिले. सुरुवातीला नायब राज्यपाल किरण बेदी यांना तडकाफडकी या पदावरुन काढण्यात आले. त्यानंतर काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारही अल्पमतात आले. या छोट्या राज्यावरही काँग्रेसला पाणी सोडावे लागले. आता यूपीए आणि एनडीएला सत्तेत येण्याची आशा आहे. तत्पूर्वी टाइम्स नाऊ आणि सी व्होटरने ओपिनयन पोलद्वारे मतदारांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पुद्दुचेरीत आपली सत्ता राखणार की हेही राज्य आपल्या हातातून गमावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टाइम्स नाऊ आणि सी व्होटरच्या ओपिनयन पोलमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता कमी आहे. यूपीएला 30 पैकी 12 तर एनडीएला 18 जागा मिळू शकतात. 

पुद्दुचेरीत मुख्यमंत्रिपदासाठी 36 टक्के जणांनी काँग्रेसचे के व्ही नारायणसामी यांचे नाव घेतले तर 42 टक्के जणांनी एआयएनआरसीचे के एन रंगास्वामी यांना पसंती दर्शवली आहे. काँग्रेस सरकारच्या कामावर 21.75 टक्के लोकांनी जास्त समाधानी असल्याचे म्हटले तर 21.88 टक्के लोकांनी काही मर्यादेपर्यंत समाधानी असल्याचे म्हटले. तर 32.41 टक्के लोकांनी ते अजिबात समाधानी नसल्याचे म्हटले. 23.96 टक्के जणांनी काही सांगू शकत नसल्याचे म्हटले. 

मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर 34.92 टक्के लोक खूप समाधानी तर 15.96 टक्के जणांनी काही मर्यादेपर्यंत समाधानी असल्याचे सांगितले. 45.53 टक्के लोकांनी अजिबात समाधानी नसल्याचे म्हटले. 3.58 लोकांनी माहीत नसल्याचे म्हटले. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास यूपीएला 37.6 टक्के, एनडीएला 44.5 टक्के आणि इतर पक्षांना 17.9 टक्के मते मिळू शकतात. 2016 मध्ये एनडीएला 30.5 टक्के मते मिळाली होती. तर यूपीएला 39.5 टक्के मते मिळाली होती. अंदाजानुसार भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला 16 ते 20 जागा मिळू शकतात. मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे. 2016 च्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला 12 जागा मिळाल्या होत्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com