Tripura Election Result : राहुल गांधीची निवडणूक प्रचाराकडे पाठ; सुपडा साफ झाल्यानंतर काँग्रेस नेते म्हणतात…

Assembly Election 2023 Result Tripura election result rahul gadhi not goes to campaign congress says setback
Assembly Election 2023 Result Tripura election result rahul gadhi not goes to campaign congress says setback esakal

Tripura Election Result : ईशान्य भारतातील तीन राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत.आज सुरू असलेल्या मतमोजणीत त्रिपुरामध्ये भाजप दुसऱ्यांदा बहुमत मिळवण्याकडे वाटचाल करत आहे.

आज सकाळी हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप ३४ जागांवार आघाडीवर आहे. तर काँग्रेसपासून वेगळी झालेल्या टिपरा मोथा पार्टीच्या खात्यात आतापर्यंत ११ जागा जाऊ शकतात. तर डावे पक्ष आणि काँग्रेस यांच्या युतीला आतापर्यंत फक्त १२ जागांवर आघाडी मिळली आहे. याव्यतिरिक्त मेघालयमध्ये देखील काँग्रेसची स्थिती खराब आहे.

नागालँडमध्ये देखील काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे. यावरुन २०२३ ची सुरूवात काँग्रेससाठी निराशाजनक ठरली आहे.

Assembly Election 2023 Result Tripura election result rahul gadhi not goes to campaign congress says setback
Pune Bypoll Election Result : कसब्यात गेल्या ४० वर्षात भाजपचा विजय नेहमी…; निकालापूर्वी राऊतांचं मोठं वक्तव्य

मेघालय, नागालँडमधील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (२७ फेब्रुवारी ) मतदान पार पडलं होतो. तर, त्रिपुरा मध्ये १६ फेब्रुवारी रोजी मतदान झालं. आज तिन्ही राज्यांची मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणूकांचे निकाल हाती येत असतानाच काँग्रेस नेत्यांनी हा त्यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस नेता अखिलेश प्रसाद सिंह यांनी आमच्या अपेक्षाभंग झाला असून हा त्यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर काँग्रेस नेते सुप्रिया श्रीनेत यांनी हे निकाल संपूर्ण देशासाठी लागू करणे चुकीचे ठरेल असे म्हटले आहे. ते म्हणाले की, भाजपच्या प्रचारामुळे त्यांना हा विजय मिळाला आहे. मात्र याला संपूर्ण देशाचा कौल म्हणणे चुक आहे. त्यांनी सांगितले की या राज्यातील निवडणूक निकाल हे केंद्रात सत्ता कोणाची आहे यावरून ठरतात.

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

Assembly Election 2023 Result Tripura election result rahul gadhi not goes to campaign congress says setback
Sagar 143 Punam : मी तुला नाही म्हणाले पण…; शाळेतल्या मुलीचं 'लव्ह लेटर' व्हायरल, चर्चा मात्र मेमरी कार्डची

काँग्रेस कुठं मागं पडली?

राहुल गांधी यांच्या प्रचाराबाबत देखील राजकीय विश्लेशक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी मेघालय मध्ये एक रॅली केली होती मात्र राजकीय दृष्ट्या महत्वाचे असणाऱ्या त्रीपुराकडे राहुल गांधी फिरकलेही नाहीत.

यावरून काँग्रेसच्या रणनीतीवर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याउलट भाजपने त्रिपुरासहित या तीन्ही राज्यात जोरदार प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्रिपुरामध्ये कित्येक रॅलींमध्ये सहभागी झाले. तसेच अमित शहा जेपी नड्डा यांनी देखील प्रचारात झोकून दिले होते. यूपीचे सीएम आदित्यनाथ यांनी देखील त्रिपुरा चा दौरा करत हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com