
Pune Bypoll Election Result : कसब्यात गेल्या ४० वर्षात भाजपचा विजय नेहमी…; निकालापूर्वी राऊतांचं मोठं वक्तव्य
मागील काही दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूकीचा आज निकाल लागणार आहे. यासाठीची मतमोजणी सुरू असून या निवडणूकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यादरम्यान खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे
पोटनिवडणूक निकाल या विषयी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेल्या ४० वर्षांपासून कसब्यात भाजपचा विजय हा नेहमी शिवसेनेच्या पाठिंब्याने होत आला आहे असे राऊत म्हणाले . शिवसेना ही महाविकास आघाडीचा घटक आहे त्याचा परिणाम कसब्यामध्ये दिसून येतो आहे. चिंचवडचे पूर्ण निकाल येऊ द्या. चिंचवड मतदारसंघात देखील शेवटपर्यंत भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही असेही संजय राऊत म्हणाले आहेत.
चिंचवडमध्ये आम्ही आपेक्षा ठेवून आहोत. तिरंगी लढत आहे पण आम्ही पाहतोय. कसब्यामध्ये भाजपचा गड कोसळणार. चिंचवड हा काही भाजपचा गड नव्हता तिथ एका जगताप कुटुंबाची मक्तेदारी होती. तिथं पक्षापेक्षा जगताप पॅटर्न चालतो असं म्हणतात. जगताप पॅटर्न काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
आजच्या निवडणूकीत भाजपचे हेमंत रासनेंना आणि मविआनं रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. तर चिंचवडला भाजपच्या अश्विनी जगताप, मविआचे नाना काटे आणि राहुल कलाटे अपक्ष अशी तिहेरी लढत सुरु आहे.
आत्तापर्यंत कुठे कोण आघाडीवर?
कसबा पेठ विधानसभा सभा पोटनिवडणूक मतमोजणी...
नवव्या फेरी अखेर
१) रवींद्र धंगेकर ४२४१
२) हेमंत रासने ३०८३
४२०० मतांनी धंगेकर आघाडीवर
चिंचवड विधानसभा सभा पोटनिवडणूक मतमोजणी...
फेरी क्रमांक 8
1) अश्विनी जगताप-25125
2) नाना काटे-20945
3) राहुल कलाटे-8996