Assembly Elections 2022 : Twitter ची मतदारांसाठी विशेष घोषणा, एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

assembly elections 2022 twitter india twitter announces initiatives for voters

Twitter ची मतदारांसाठी विशेष घोषणा, एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा येथे 10 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान सात टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार असून 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीत एकूण 690 विधानसभा जागांसाठी निवडणुका होणार आहेत आणि 18.3 कोटी नागरिक, 8.5 कोटी महिलांसह ते मतदान करण्यास पात्र असतील. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने विधानसभा निवडणुका 2022च्या पार्श्वभूमीवर #JagrukVoter मोहीम सुरू केली आहे. (assembly elections 2022 twitter india twitter announces initiatives for voters)

ट्विटरचे म्हणणे आहे की, लोक निवडणुकीदरम्यान विश्वासार्ह माहिती मिळविण्यासाठी, उमेदवार आणि त्यांच्या घोषणापत्रांबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्या प्लॅटफॉर्मला भेट देतात. त्यामुळे #JagrukVoter मोहिमेअंतर्गत लोकांना एकाच ठिकाणी निवडणुकीशी संबंधित माहिती दिली जाईल. याशिवाय या मोहिमेअंतर्गत लोकांना प्रश्नोत्तराची संधीही मिळणार आहे. या मोहिमेअंतर्गत, तुम्ही #AssemblyElections2022 हा हॅशटॅग वापरुन या पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची माहिती मिळवू शकता.

उपक्रमांचा एक भाग म्हणून, Twitter एक कस्टमाइज इमोजी लाँच करेल ज्याला नोटिफीकेशन आणि रिमाइंडर यंत्रणेचा सपोर्ट दिला जाईल, ज्यामुळे लोकांना मतदान सुरू होण्याच्या दिवशी रिमाइंडर स्वतःसाठी सेट करता येईल. तसेच या उपक्रमात प्रश्न-उत्तरे करता येतील ज्यामुळे लोकांचा या उपक्रमात सहभाग वाढणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी विश्वासार्ह आणि अधिकृत माहिती शोधणे सोपे व्हावे यासाठी त्यांनी भारतीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकार्‍यांच्या सहभागाने ट्विटर एख माहिती शोधण्यासाठी एक प्रॉम्प्ट सुरू करणार आहे. ज्यामुळे जेव्हा लोक Twitter वर निवडणूकीसंबंधी कीवर्डसह शोधतील तेव्हा हे प्रॉम्प्ट माहितीचे विश्वसनीय, अधिकृत स्त्रोत त्याना दाखवेल किंवा लोकांना योग्या माहितीच्या लिंक मिळवून देईल, यामध्ये मतदार मतदानाच्या तारखा, मतदान केंद्र आणि बरेच काही याबद्दल विश्वसनीय माहिती मिळवू शकतात. तसेच तुम्हाला इंग्रजी व्यतिरिक्त, सर्च प्रॉम्प्ट हिंदी, पंजाबी आणि कोकणीमध्ये उपलब्ध असेल आणि त्याला अनेक हॅशटॅगचा सपोर्ट मिळेल.

हेही वाचा: ओमिक्रॉन सामान्य सर्दी-खोकला नाही; केंद्र सरकारचा सतर्कतेचा इशारा

विधानसभा निवडणूक 2022 साठी खास हॅशटॅग

English: #AssemblyElections2022, #StateElections2022, #AssemblyPolls2022, #UttarPradeshElections, #UttarPradeshElections2022, #UttarakhandElections, #UttarakhandElections2022, #PunjabElections, #PunjabElections2022, #ManipurElections, #ManipurElections2022, #GoaElections, #GoaElections2022

Hindi: #विधानसभाचुनाव, #विधानसभाचुनाव2022, #उत्तरप्रदेशविधानसभाचुनाव, #पंजाबविधानसभाचुनाव, #गोवाविधानसभाचुनाव, #मणिपुरविधानसभाचुनाव, #उत्तराखंडविधानसभाचुनाव, #उत्तरप्रदेशविधानसभाचुनाव२०२२ , #उत्तरप्रदेशचुनाव, #उत्तरप्रदेशचुनाव२०२२, #उत्तराखंडविधानसभाचुनाव२०२२, #उत्तराखंडचुनाव, #उत्तराखंडचुनाव२०२२

पंजाबी: #ਪੰਜਾਬਰਾਜਚੋ, #ਪੰਜਾਬਵਿਧਾਨਸਭਾਚੋ, #ਪੰਜਾਬਵਿਧਾਨਸਭਾਚੋ 2022

Konkani: #विधानसभावेंचणूक, #गोवावेंचणूक, #गोवाविधानसभावेंचणूक2022

हेही वाचा: पेन्शनधारकांसाठी गुड न्युज, घरबसल्या जमा करता येणार जीवन प्रमाणपत्र

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top