AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

कोविशील्ड हे चिंपांझी या माकडांमध्ये आढळणाऱ्या सामान्य व्हायरल संसर्गाच्या एडेनोव्हायरसचा वापर करून तयार केले गेले
AstraZeneca Covid Vaccine Side Effects
AstraZeneca Covid Vaccine Side Effectsesakal

कोविड लसीचे दुष्परिणाम (AstraZeneca Covid Vaccine Side Effects):

कोरोना काळात संजिवनी बुटी म्हणून चर्चेत असलेली कोरोना लस आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोरोना विषाणूपासून बचाव करते म्हणून मोठा गाजावाजा झालेल्या या लसीचे आता मात्र दुष्परिणाम दिसू लागले आहेत. Covishield लस उत्पादक कंपनी AstraZeneca ने ब्रिटिश न्यायालयात एक मोठा खुलासा केला आहे.

या कंपनीने न्यायालयात स्पष्टिकरण देताना कबूल केले आहे की, कोविड-19 लसीचे दुष्परिणाम होऊ शकतात. कंपनीने आता असा दावा केलाय की, या लसीच्या दुष्परिणामांची तिव्रता कमी आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोविशील्ड लस भारतात केव्हा आणि किती चाचण्यांनंतर मंजूर केली, या बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.

AstraZeneca Covid Vaccine Side Effects
COVID-19 Vaccine : आनंदाची बातमी! कर्करोगाच्या रुग्णांवर कोरोना लस ठरतेय प्रभावी; संशोधनातून स्पष्ट

व्हायरल वेक्टर प्लॅटफॉर्म वापरून कोविशील्ड तयार केले गेले. हे पूर्णपणे वेगळे तंत्रज्ञान होते. कोविशील्ड हे चिंपांझी या माकडांमध्ये आढळणाऱ्या सामान्य व्हायरल संसर्गाच्या एडेनोव्हायरसचा वापर करून तयार केले गेले. एडिनोव्हायरसची अनुवांशिक सामग्री SARS-CoV-2 कोरोनाव्हायरसच्या स्पाइक प्रोटीन सारखीच आहे.

हा विषाणू शरीराच्या पेशींमध्ये स्पाइक प्रोटीनद्वारेच प्रवेश करतो. इबोला विषाणूशी लढणाऱ्या लसीप्रमाणेच कोविशील्ड तयार करण्यात आले होते.  सीरम इन्स्टिट्यूटने 23,745 हून अधिक लोकांवर पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी घेतली होती. त्याचे परिणाम 70.42 टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले.

AstraZeneca Covid Vaccine Side Effects
Covid Vaccination : कोविड-19 लसीकरणकरिता नाकावाटे घ्यावयाचे इन्कोव्हॅक वापरावे; केडीएमसीचे आवाहन

तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या 1600 लोकांवर घेण्यात आल्या. AstraZeneca ने 23 नोव्हेंबर 2020 रोजी तिच्या फेज-3 क्लिनिकल चाचण्यांचे निकाल जाहीर केले. यानुसार, जेव्हा अर्धा आणि एक पूर्ण डोस दिला गेला तेव्हा तो 90% पर्यंत प्रभावी राहिला. तर, दोन पूर्ण डोस दिल्यानंतर 62 प्रभावी होते.

यानंतर सरकारने लसीकरण करण्यास मान्यता दिली. आणि 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरू झाले. चाचणी दरम्यान ज्यांना लस देण्यात आली त्यापैकी काहींना डोकेदुखी आणि सौम्य ताप आला. जो सामान्य औषधाने काही दिवसात बरा झाला.

AstraZeneca Covid Vaccine Side Effects
Nashik COVID Update : शहरात रुग्ण कोरोनामुक्त

लसीच्या चाचणीचे टप्पे

माणसांवर लसीची चाचणी एकूण चार टप्प्यांत होते. पहिल्या टप्प्यात या लसीचे काही दुष्परिणाम आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे ही लस सुरक्षित आहे का आणि मानव ती सहज घेऊ शकतात की नाही?

दुसऱ्या टप्प्यात, लस शरीरात प्रवेश केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत होते की नाही हे पाहिले जाईल. जेणेकरून मानव या विषाणूशी लढू शकेल.

तिसऱ्या टप्प्यात, संशोधक त्यांच्या निष्कर्षांची पुष्टी करतात की त्यांनी तयार केलेली लस योग्य आहे की नाही. हा सर्वात महत्वाचा अंतिम टप्पा मानला जातो.

चौथ्या टप्प्यात, संशोधक लस प्रभावी ठरत आहे की नाही हे पाहण्यासाठी वास्तविक जगात लसीच्या परिणामावर लक्ष ठेवतात.

AstraZeneca Covid Vaccine Side Effects
Covid Study: कोरोनामुळे इतर जगापेक्षा भारतीयांच्या फुफ्फुसांचं झालं सर्वाधिक नुकसान, संशोधनात समोर आली धक्कादायक बाब समोर

दोन लसींमध्ये किती अंतर होते

16 जानेवारी 2021 रोजी भारतात कोरोना विरूद्ध लसीकरण सुरू झाले तेव्हा मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट होती. Covishield च्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे म्हणजे चार आठवड्यांचे अंतर असावे. कमाल 42 दिवस म्हणजे सहा आठवडे अंतर असेल. पण त्यानंतर कोविशील्डच्या दुसऱ्या डोसबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये दोनदा बदल झाला आहे.

काय आहे संपूर्ण वाद

केंद्र सरकारने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे की, कोविशील्डच्या दोन डोसमध्ये 12-16 आठवड्यांचे अंतर असेल. एखाद्याने त्याच्या दुष्परिणामांबद्दल सांगितले आहे. सोमवारी 29 एप्रिल रोजी UK उच्च न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये, AstraZeneca ने प्रथमच कबूल केले की त्यांच्या कोविड-19 लसीमुळे दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका, ब्रेन स्ट्रोक आणि प्लेटलेट्स कमी होऊ शकतात.

अनेक देशांमध्ये, AstraZeneca लस Covishield या नावाने विकली जात होती. AstraZeneca ची कोविड-19 लस लाँच केली गेली होती. तेव्हाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कोविड लस घाईघाईत बनवल्याचं म्हटलं होतं. त्याचे सर्व टप्पेही पूर्ण होऊ दिले नाहीत.

मात्र चाचणीदरम्यान या लसीचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम आढळून आले नसल्याचे कंपनीने त्यावेळी सांगितले होते. लसीकरणानंतर थकवा, सौम्य ताप, घसादुखी अशी लक्षणे आढळून आल्याचे सांगण्यात आले.

ही लस कोणी तयार केली

ही लस भारतात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ने तयार केली आहे. लस बाजारात येण्यापूर्वीच SII ने AstraZeneca सोबत करार केला होता. हे ज्ञात आहे की सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतातील लसीच्या डोसपैकी 80 टक्के डोस एकट्या कोविशील्ड आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com