दिलासादायक! दोन दिवसांत होणार कोरोना विषाणू नष्ट; Glenmarkचं नवं संशोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Glenmark nasal spray

दिलासादायक! दोन दिवसांत होणार कोरोना विषाणू नष्ट; Glenmarkचं नवं संशोधन

मुंबई : कोरोना विषाणूवर प्रभावी औषध म्हणून वापर करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या नेझल स्प्रे बनवण्यात ग्लेनमार्क या औषध कंपनीला यश आलं आहे. ग्लेनमार्क (Glenmark) या कंपनीने सॅनोटाईझ या कंपनीच्या संयुक्त संशोधनातून हे औषध बनवलं आहे. कोरोना रूग्णांना हे औषध नाकात सोडावं लागणार आहे. नाकात सोडण्यात येणाऱ्या या औषधामुळे कोरोना विषाणू ४८ तासाच्या आत नष्ट होत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे.

(Corona Virus Nasal Spray)

दरम्यान, ग्लेनमार्क या कंपनीने तयार केलेल्या या औषधाची चाचणी घेण्यात आली असून यासंदर्भातील अहवाल साउथ ईस्ट एशिया जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार, ग्लेनमार्क (Glenmark) आणि सॅनोटाईझ या कंपनीने तयार केलेला हा स्प्रे मारल्यानंतर दोन दिवसांत कोरोनाचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे कोरोनाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण संशोधन म्हणून याकडे पाहिलं जातंय. दरम्यान लवकरच भारतीय रूग्णांसाठी हा स्प्रे उपलब्ध होणार आहे.

हेही वाचा: Video Viral: पुण्यातील टिळक रोडवर तरूणांची फ्री स्टाईल हाणामारी

या औषधाच्या चाचणीमध्ये रूग्णांच्या सात दिवसांच्या चाचणीचे मूल्यमापण केलं आहे. त्यामध्ये रूग्णांच्या प्रत्येक नाकपुडीत दिवसातून दोन वेळा हा स्प्रे मारण्यात आला. त्यानंतर या रूग्णांच्या विषाणूची पातळी तपासली असता साकारात्मक प्रतिसाद आढळून आला होता. त्यानंतरच्या निरिक्षणातून एका दिवसांत ९४ टक्के आणि दोन दिवसांत ९९ टक्के कोरोना विषाणूचा नायनाट झाल्याचं आढळून आलं आहे.

लवकरच भारतीय ग्राहकांसाठी आणि रूग्णांसाठी हे औषध उपलब्ध होणार आहे. २५ मिलीच्या स्प्रे साठी भारतीयांना ८५० रूपये मोजावे लागणार आहेत. येत्या आठवड्यात हे औषध भारतीयांना उपलब्ध होणार असून यासंदर्भातील माहिती ग्लेनमार्कचे सिनिअर व्हाईस प्रेसिडंट डॉ.मोनिका टंडन यांनी दिली.

Web Title: Glenmark New Research On Corona Nasal Spray Destroy Corona In 48 Hour

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top