झारखंडमध्ये कोळसा खाणीत भीषण अपघात; 3 ठार, अनेक जखमी : Coal Mine Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Coal-Mine

Coal Mine Accident: झारखंडमध्ये कोळसा खाणीत भीषण अपघात; 3 ठार, अनेक जखमी

रांची : झारखंडच्या धनबाद इथल्या एका अवैध कोळसा खाणीत भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत ३ जण जागीच ठार झाले आहेत तर अनेकजण यामध्ये अडकून पडले आहेत. तसेच अनेक जखमी झाले आहेत. भोवरा कोलिअरी भागातील या खाणीत शुक्रवारी सकाळी ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. (At least three dead many feared trapped in illegal coal mine collapse in Jharkhand Dhanbad)

दि प्रिंटच्या वृत्तानुसार, भोवरा कोलिअरी भागातील भारत कुकिंग कोल लिमिटेडच्या (BCCL) परिसरात ही दुर्घटना घडली आहे. पोलीस उपाधिक्षक अभिषेक कुमा यांनी सांगितलं की, नेमका किती लोकांचा मृत्यू झाला हे बचाव पथकाचे लोक पीडितांपर्यंत पोहोचल्यानंतरच सांगता येईल. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, अनेक स्थानिक लोक हे इथं अवैध खाण खनन कामात गुंतले आहेत. (Latest Marathi News)

दरम्यान, स्थानिकांच्या मदतीनं तीन ढिगाऱ्याखालून तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं, असं ही दुर्घटना डोळ्यानं पाहिलेल्या व्यक्तीनं सांगितलं.

टॅग्स :Desh news