PM मोदींनी खास संदेशासह वाहिली अटलजींना श्रद्धांजली

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 16 August 2020

मोदींनी शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडिओची सुरुवात हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा.. या वाजपेयी यांची प्रसिद्ध कवितेच्या ओळींनी होते.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज दुसरा स्मृतीदिन. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल बिहारी मेमोरियल येथे जात माजी पंतप्रधान वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी मोदींनी ट्विटच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांच्या आठवणीला उजाळा दिला. देशाच्या विकासामध्ये आपले योगदान अविस्मरणीय आहे, असे मोदींनी म्हटले आहे. यासोबत मोदींनी  1.48 मिनिटांचा एक व्हिडिओही शेअर केलाय. मोदींशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांच्यासह अन्य नेत्यांनीही अटलजींना श्रद्धांजली वाहिली आहे. 

खूशखबर! WhatsApp ने लाँच केलं नवं फीचर

मोदींनी शेअर केलेल्या पोस्टमधील व्हिडिओची सुरुवात हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा.. या वाजपेयी यांची प्रसिद्ध कवितेच्या ओळींनी होते. अटल बिहारी वाजपेयी यांचे योगदान देश कधीच विसरणार नाही, असे मोदींनी म्हटले आहे. एक नेता, खासदार, मंत्री आणि पंतप्रधान या प्रवासात त्यांनी एक आदर्श घालून ठेवला आहे, असा उल्लेखही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. 

खूशखबर! WhatsApp ने लाँच केलं नवं फीचर

16 ऑगस्ट 2018 रोजी भारतरत्न आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संपूर्ण देश हळहळला होता. अटल बिहारी वाजपेयी अशा नेत्यांच्या यादीतील एक नाव आहे जे एका पक्षापुरते मर्यादीत न राहता इतर पक्षांमध्ये त्यांच्याप्रती आदराची भावना होती. जम्मू काश्मिरमध्येही त्यांची लोकप्रियता पाहायला मिळाली.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: atal bihari vajpayee death anniversary 16 august narendra modi tributes