खूशखबर! WhatsApp ने लाँच केलं नवं फीचर

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 16 August 2020

आताही Whatsapp ने नवीन फीचर लाँच केलं आहे. त्यांनी आधीच्या त्यांच्या एका फीचरमध्ये हे अपडेट दिले आहेत.

नवी दिल्ली - जगभरात व्हॉटसअॅप हे सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. व्हॉटसअॅप त्यांच्या युजर्ससाठी सातत्याने नवे अपडेट देत असतं. आताही Whatsapp ने नवीन फीचर लाँच केलं आहे. त्यांनी आधीच्या त्यांच्या एका फीचरमध्ये हे अपडेट दिले आहेत. काही दिवसांपुर्वी WhatsApp ने त्यांच्या फीचरमध्ये स्टीकर(stickers) फीचर लॉंच केले होते. तेंव्हापासून हे फीचर ग्राहकांच्या पसंतीस उतरले होते. हे फीचर आल्यानंतर प्रसिध्दही झालं होतं. युजर्सच्या पसंतीस उतरलेलं स्टीकर फीचर मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे. आता युजर्सना आणखी एक आनंदाची बातमी व्हॉटसअॅपने दिली आहे.  आजपासून WhatsApp स्टीकर फीचरमध्ये नवीन दोन स्टीकर पॅड येणार आहेत.

WABetaInfo ने ट्वीटरवून व्हॉटस्ॅपच्या नव्या फीचरची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी सांगितले की, दोन स्टीकर पॅक फीचर देण्यात येणार आहेत. यामध्ये YaYa आणि Hacker Girl यांचा समावेश आहे. याचा वापर WhatsApp युजर्स आजपासून करू शकतात.

कसा करायचा वापर?
नवीन स्टीकरचा वापर करण्यासाठी सर्वात आधी कोणत्याही एका चॅटमध्ये जा. चॅट करताना इमोजी पाठवतो त्यावर क्लिक करा. इमोजी आयकॉनवर क्लिक करताच तिथे emoji, GIF, आणि Sticker असे पर्याय दिसतील. त्यापैकी Sticker पर्यायावर क्लिक केल्यानंतर त्याच्या उजव्या बाजूला '+'  हे चिन्ह दिसेल. त्यावर क्लिक करताच नवीन स्टिकर्स अपडेट झालेली दिसतील.

अनलिमिटेड स्टिकर्सचा पर्याय
WhatsApp ने काही दिवसांपुर्वीच android आणि iOS वापरकर्त्यांसाठी Animated Stickers लॉंच केले होते. वापरकर्त्यांना अॅपच्या स्टीकर स्टोअरजवळ unlimited stickers चा पर्यायसुद्धा मिळेल. स्टिकर स्टोअरच्या शेजारीच एक play पर्यायाचं बटन दिलं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सना जुन्या आणि नव्या stickers मधला फरक कळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: whatsapp new sticker pack launch see how to use