अश्लील कृत्य : वर्गात घुसून विद्यार्थिनीचे कपडे काढले; विद्यार्थ्यांसमोर केली लघवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Atrocities on schoolgirls

वर्गात घुसून विद्यार्थिनीचे कपडे काढले; विद्यार्थ्यांसमोर केली लघवी

नवी दिल्ली : पूर्व दिल्लीत तरुणाने सरकारी शाळेच्या वर्गात घुसून दोन मुलींवर लैंगिक अत्याचार (Atrocities on schoolgirls) केला. एवढेच नाही तर त्याने आपले कपडे काढून विद्यार्थ्यांसमोर लघवीही (Urine) केली. याप्रकरणी पोलिसांनी पूर्व दिल्ली महानगरपालिका शाळेतील मुलींच्या लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेशी संबंधित तपशील दिलेला नाही. (Atrocities on schoolgirls)

पाचवीपर्यंतचे विद्यार्थी महापालिकेच्या या शाळेमध्ये शिकतात. शाळेच्या संमेलनानंतर विद्यार्थी वर्गात शिक्षकांची वाट पाहत होते. तेव्हा अनोळखी तरुण वर्गात घुसला. त्याने मुलीचे कपडे काढले आणि अश्लील शब्द बोलले. यानंतर तो दुसऱ्या मुलीकडे गेला. यावेळी त्याने तिचे आणि आपले कपडे काढले. यानंतर तरुणाने वर्गाचा दरवाजा बंद करून विद्यार्थ्यांसमोर लघवी (Urine) केली. ही गंभीर बाब असून तातडीने कारवाई करावी, असे दिल्ली महिला आयोगाने ३० एप्रिल रोजी जारी केलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा: आव्हाड म्हणाले, राज ठाकरेंना वाटते की ते बाळासाहेब होऊ शकतात, म्हणून...

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा (Atrocities on schoolgirls) दाखल केला आहे. तसेच आरोपी तरुणाला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. आयोगाने पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागवली आहे. याशिवाय आरोपीचा तपशील, पीडितेला बाल कल्याण समितीसमोर हजर केले का?, वर्गशिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कारवाई झाली का? आदी तपशीलही आयोगाने मागवले आहेत.

६ मेपर्यंत माहिती मागवली

विद्यार्थिनींनी प्राचार्य आणि शिक्षकांना घटनेची माहिती दिली तेव्हा त्यांनी त्यांना शांत राहण्यास आणि हा प्रकार विसरून जाण्यासा सांगितले, असा दावा दिल्ली महिला आयोगाने केला आहे. यामुळेच दिल्ली महिला आयोगाने ६ मेपर्यंत माहिती मागवली आहे. ईडीएमसीच्या महापौरांकडून या प्रकरणावर सविस्तर कृती अहवाल मागवला आहे.

Web Title: Atrocities On Schoolgirls Clothes Taken Off Urine Done In Front Of Students Crime News Delhi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top