
अल्पवयीन मुलीचे अपहरण; तिघांनी दोन दिवस केला आळीपाळीने बलात्कार
बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी परीक्षा देऊन शाळेतून घरी परतत होती. वाटेत तीन मुलांनी तिचे अपहरण (Abduction) केले. अपहरण केल्यानंतर तिन्ही मुलांनी दोन दिवस तिला निर्जनस्थळी डांबून ठेवले. तसेच आळीपाळीने सामूहिक बलात्कार (Atrocities on the girl) केला. ही घटना राजस्थानमधील भरतपूरमध्ये सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीसोबत घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे तर अन्य दोन आरोपी फरार आहेत. (Atrocities on the girl in rajasthan)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातव्या वर्गात शिकणारी अल्पवयीन विद्यार्थिनी मोठ्या बहिणीसोबत परीक्षा देऊन शाळेतून घरी परतत होती. वाटेत गावातील तीन तरुणांनी त्यांना अडवले. तिन्ही तरुणांनी अल्पवयीन मुलीच्या मोठ्या बहिणीला मारहाण करून पळ काढला. काही वेळांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण (Abduction) करून निर्जनस्थळी नेले.
तेथे तिघांनी अल्पवयीन मुलीवर दोन दिवस आळीपाळीने बलात्कार (Atrocities on the girl) केला. अल्पवयीन मुलीची मोठी बहीण घरी आल्यावर कुटुंबीयांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी आरोपींच्या कुटुंबीयांची भेट घेत संपूर्ण माहिती दिली आणि मुलीला परत करण्याची मागणी केली. मुलांच्या कुटुंबीयांनी मुलीच्या कुटुंबीयांना मुलीला परत करण्याचे आश्वासन दिले.
दोन दिवसांनी आरोपी मुलीला सोडून गेला तेव्हा तिने घरी पोहोचून संपूर्ण घटना सांगितली. मला एका घरात ठेवले होते. तिथे तिघांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला, असे मुलीने कुटुंबीयांना सांगितले. यानंतर सहा मे रोजी मुलीच्या आजीने चिकसाणा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
एकाला अटक; दोघांचा शोध सुरू
पोलिसांनी रविवारी एका आरोपीला अटक केली, तर अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरू आहे. सहा मे रोजी महिलेने तीन आरोपींविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत बलात्काराचा (Atrocities on the girl) गुन्हा दाखल केला होता. मुख्य आरोपीला अटक केली आहे. उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस छापेमारी करीत आहेत, असे ग्रामीण सीओ आणि तपास अधिकारी ब्रिजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितले.