
५ वर्षांचा आशिष झाला पोरका; मुलगी पाहून आल्यानंतर काळाचा घाला
नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उमरेड रोड, अड्याळी फाट्याजवळ शुक्रवारी रात्री भीषण अपघातात (Road Accident) तवेरातील सात जणांचा मृत्यू (seven Killed) झाला. त्यातून एक मुलगा बचावला. भुजाडे कुटुंब अश्विनसाठी मुलगी बघून नागपूरला परत येत होते. परत येताना काळाने सात जणांवर घाला घातला. (umred road accident news)
तवेरामध्ये एकूण ८ जण होते. मृतांध्ये अश्विन देविदास गेडाम (३१, रा. इंदोरा बाराखोली) बहीण स्नेहा आशीष भुजाडे (३०, रा. नजुल ले-आऊट जरीपटका), अश्विनचे भाऊजी आशिष विजय भुजाडे (३३), तवेरा चालक सागर संपत शेंडे (रा. पिवळी नदी), नरेंद्र बाजीराव डोंगरे, नरेंद्रचे सासरे मेघनाथ पांडूरंग पाटील आणि त्यांचे मामा पद्माकर नथ्थुजी भालेराव यांचा समावेश आहे.
हेही वाचा: पाकिस्तानी ड्रोन भारताच्या हद्दीत घुसला; बीएसएफने केला गोळीबार
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या पूर्वी आशिषने मित्रांना फोन करून सांगितले की, तुम्ही घरी जाऊ नका आम्ही १५ मिनिटांत मासे घेऊन येत आहोत. घरी बनवून खाऊ. त्यानंतर गप्पा करू. तवेरात असलेली आशिषची पत्नी, साळा अश्विन आणि इतर नातेवाईकांना काय माहिती होते की, अपघात रूपी काळ त्यांची प्रतीक्षा करीत आहे.
अड्याळी फाट्याजवळ भरधाव टिप्पर क्र. एमएच-४०/बीजी-७७५७ च्या चालकाने त्यांच्या वाहनाला ओव्हरटेक करताना जोरदार धडक (Road Accident) दिली. यात तवेराचा समोरचा भाग पूर्णत: चक्काचूर झाला. अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरच वाहन सोडून फरार झाला. पोलिसांनी चालक शंकर चकोले विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरू केला आहे.
हेही वाचा: साहेबऽऽ माझ्या पत्नीला कुटुंबीयांनी सासरी फरफटत नेले
वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार
आशीष, पत्नी स्नेहा आणि साळा अश्विन गेडाम, चालक सागर शेंडेवर शनिवारी वैशालीनगर घाटावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नरेश डोंगरे आणि पद्माकर भालेराव यांच्यावर नारा दहनघाटावर अंत्यसंस्कार झाले. तर मेघनाथ पाटील यांच्यावर परसोडी दहनघाटावर अंत्यसंस्कार पार पडले. अपघातात आशिषचा ५ वर्षांचा मुलगा बचावला.
८ दिवसांपूर्वीच लागला होता नोकरीवर
टिप्पर चालक शंकर चकोले हा आठ दिवसांपूर्वीच नोकरीवर लागला होता. जवळपास ४ वर्षांपासून तो एकटा राहतो. अपघातापासून शंकर फरार आहे. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. त्याला लवकरच पकडण्याचा विश्वास हुडकेश्वर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Web Title: Road Accident Seven Killed Umred Nagpur District Crime News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..