
उत्तर प्रदेश एटीएसने बेकायदेशीर धर्मांतर रॅकेटचा सूत्रधार जलाउद्दीन उर्फ छांगूर बाबा याला अटक केली आहे. अटकेनंतर, लखनौमधील छांगूर बाबाच्या आलिशान महालात छापा टाकला असता, पोलिसांना तिथून अनेक धक्कादायक खुलासे सापडले आहेत. बाबाच्या या महालात पॉवर बूस्टर औषधे, स्पॅनिश तेल आणि अनेक महागड्या वस्तूंसह गुप्त सीसीटीव्ही सापडले आहेत.