esakal | ममता बॅनर्जींवरील हल्ल्याची चौकशी व्हायला व्हावी - रामदास आठवले
sakal

बोलून बातमी शोधा

Ramdas Athwale

रिपाइं पश्चिम बंगालमध्ये १५ ते २० जागा लढवणार असून भाजपला पाठिंबा देणार आहे, असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.  

ममता बॅनर्जींवरील हल्ल्याची चौकशी व्हायला व्हावी - रामदास आठवले

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगालच्या नंदीग्राममध्ये प्रचारादरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाइं) (RPI) प्रमुख रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी केली आहे.  

"कृषी कायदे मागे घेतले तर मोदी अधिक ताकदवान नेते म्हणून पुढे येतील"

आठवले म्हणाले, "ममता बॅनर्जींवर कोणी हल्ला केला तसेच यामागे हल्लेखोरांचा नक्की काय हेतू होता हे आपल्याला माहिती नाही. याची चौकशी व्हायलाच हवी. मला वाटत नाही यात काही राजकारण असेल, त्यांच्यावर यापूर्वी कधीही अशा प्रकारे हल्ला झालेला नाही त्यामुळे आत्ताच कोणी असं कसं करेल?"

पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत येणार - आठवले

पश्चिम बंगालमधील एकूणच परिस्थीती पाहता भाजप (BJP) सत्तेत येईल असं मला वाटतं. ममता बॅनर्जी येथे १० वर्षे सत्तेत होत्या. आता लोकांना बदल हवा आहे. रिपाइं पश्चिम बंगालमध्ये १५ ते २० जागा लढवणार असून भाजपला पाठिंबा देणार आहे, असंही रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.  

ममता बॅनर्जी हल्ला प्रकरण नक्की काय आहे?

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममध्ये प्रचार करत असताना एक दुर्घटना घडली. यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. आपल्याला जाणीवपूर्वक गाडीच्या जवळ असताना काही लोकांनी पुढे ढकललं, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. या घटनेनंतर ममतांच्या पायाला प्लॅस्टर करण्यात आलं असून त्यांचा दवाखान्यातील हा फोटो व्हायरल झाला होता. यानंतर त्यांनी आपण व्हिलचेअरवरुन प्रचार करणार असल्याचं म्हटलं होतं. 
 

loading image