Tue, Feb 7, 2023

Elephant attacks : जंगली हत्तींच्या कळपाने केला हल्ला; चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
Published on : 15 December 2022, 10:59 am
गुवाहाटीः जंगली हत्तींच्या कळपाने केलेल्या हल्ल्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. वनअधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.
आसामच्या गोलपारामध्ये आज बिथरलेल्या जंगली हत्तींनी रस्त्यावर येत वाहनांना अडवायला सुरुवात केली होती. त्यातच या हत्तींनी गोलपारा येथे काही लोकांवर हल्ला केला. यामध्ये एका चिमुकल्यासह तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा: Basavaraj Bommai : अकाऊंट फेक की मुख्यमंत्री? 'ते' वादग्रस्त ट्विट अजूनही कायम
या घटनेमध्ये आणखी दोन लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. लखीपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी ध्रूव दत्ता यांनी सांगितलं की, गोलपारामध्ये जंगली हत्तींच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय दोन वाहानं क्षतिग्रस्त झाले आहेत.