'मंदीपासून लक्ष हटविण्यासाठी चांद्रयान-2'

वृत्तसंस्था
Friday, 6 September 2019

देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून चांद्रयान-2 या मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 

कोलकता : देशातील आर्थिक मंदीच्या स्थितीवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी सरकारकडून चांद्रयान-2 या मोहिमेचा वापर केला जात आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. 

पश्चिम बंगाल विधानसभेत ममता बॅनर्जी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भारताने यापूर्वी कधीही कुठल्याही अंतराळ मोहिमेचे नेतृत्व केलेलेच नाही, अशा पद्धतीने केंद्रातील मोदी सरकार चांद्रयान-2 चा प्रचार करत आहे. मात्र, देशात निर्माण झालेल्या आर्थिक संकटाला लपवण्यासाठीच सरकारकडून वापर केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक झाली आहे. त्याबाबत त्या म्हणाल्या, भाजप सरकारने त्यांच्याबाबत सन्मान दाखवणे गरजेचे होते. पण असे झाले नाही. आता या प्रकरणात कायदा आपले काम करेल.

आणखी वाचा

नॉट रिचेबल हर्षवर्धन पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; काय ठरलं?

चंद्रावर तिरंगा फडकविण्यासाठी ‘विक्रम’ सज्ज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: attempt to divert attention from economic disaster says Mamata Banerjee