esakal | लखीमपूर हिंसाचार : हिंदू विरुद्ध शीख युद्ध पेटवण्याचा प्रयत्न - वरुण गांधी
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MP Varun Gandhi

लखीमपूर : हिंदू विरुद्ध शीख युद्ध पेटवण्याचा प्रयत्न - वरुण गांधी

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : लखीमपूर शेतकरी हत्याकांडप्रकरणी भाजप खासदार वरुण गांधी सातत्याने योगी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. आज त्यांनी पु्न्हा एकदा सरकारवर निशाणा साधला. ट्विटद्वारे त्यांनी म्हटलं की, लखीमपूर खिरी येथील हिंसाचाराला हिंदू विरुद्ध शीख असं युद्ध पेटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वरुण गांधी म्हणाले, "लखीमपूर घटनेत हिंदू विरुद्ध शीख असं युद्ध पेटवण्याचा प्रयत्न करणं हे केवळ अनैतिक आणि चुकीचंच नव्हे तर जुन्या जखमांच्या खपल्या पुन्हा काढण्यासारखं असून हे धोकादायक आहे. जी गोष्ट ठीक होण्यास अनेक पिढ्या जाव्या लागल्या. आपल्याला राष्ट्रीय एकतेपेक्षा अधिक राजकीय लाभाचा विचार करता कामा नये, असंही वरुण गांधी यांनी म्हटलं आहे"

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ सातत्यानं भूमिका

लखीमपूर खिरीमध्ये तीन ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसक घटनेपासून वरुण गांधी सातत्यानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्विटद्वारे भूमिका घेत आहेत. यासंबंधी त्यांनी योगी सरकारला एक पत्रही लिहिलं होतं. तसेच पीडित कुटुंबियांना न्याय आणि दोषींवर कडक करावाईची मागणीही केली होती.

शेतकऱ्यांना न्याय मिळायला हवा

वरुण गांधींनी लखीमपूर घटनेनंतर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं होतं की, "या व्हिडिओतून स्पष्ट होतंय. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना या हत्याकांडावर बोलण्यापासून रोखलं जाऊ शकत नाही. निरपराध शेतकऱ्यांचं जे रक्त सांडलं आहे, त्याची जबाबदारी निश्चित व्हायला हवी आणि न्याय मिळायलाच हवा. शेतकऱ्यांपुढे असा संदेश जाता कामा नये की आम्ही क्रूर आहोत"

भाजपच्या नव्या कार्यकारिणीतून वरुण गांधी, मनेका गांधींना वगळलं

नुकतीच भाजपने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून मनेका गांधी आणि वरुण गांधी या मायलेकाला वगळण्यात आलं. लखीमपूर खिरी हिंसाचारावर वरुण गांधी यांनी मोदी आणि योगी सरकारला सवाल विचारण्याचं काम केल्यानं त्यांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आलेलं नाही, असं बोललं जात आहे. २०२२ मधील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने नवी राष्ट्रीय कार्यकारिणी घोषीत केली आहे.

loading image
go to top