

Police investigation after ₹3.02 crore in cash was recovered from an auto driver’s house in Sagar, Madhya Pradesh.
esakal
सागर : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात रिक्षाचालकाच्या घरातून तब्बल 3 कोटी 2 लाख रुपयांची रोकड जप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता लोकायुक्त पोलिसांनी मोठी कारवाई करत सार्वजनिक बांधकाम विभागातील (PWD) अभियंता रमेश अहिरवार, त्यांची पत्नी आणि अन्य दोन सहकाऱ्यांविरोधात नामजद एफआयआर दाखल केला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी लोकायुक्तांनी पाच सदस्यांचे विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले आहे. दरम्यान, आयकर विभागानेही संबंधित अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.