

Supriti Mahapatra
Esakal
एका रिक्षाचालकाच्या मुलीने आयटीआयच्या ऑटोमोबाईल ट्रेडमध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. या यशानंतर पुरी येथील सुप्रिती महापात्रा हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे या अभ्यासक्रमात मुलींचं प्रमाण कमी असताना तिने मुलांनाही मागे टाकलं आहे. तिच्या या यशाची दखल आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलीय. २२ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सुप्रितीचा सन्मान करणार आहेत.