रिक्षाचालकाने पटवल्या हजारो सुशिक्षीत मुली...

वृत्तसंस्था
Saturday, 7 September 2019

एका रिक्षाचालकाने एक, दोन, तीन नव्हे तीन हजार युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक युवतींचे नग्न छायाचित्रे आढळली.

लखनौः एका रिक्षाचालकाने एक, दोन, तीन नव्हे तीन हजार युवतींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक युवतींचे नग्न छायाचित्रे आढळली. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहणार जावेद (वय 52, रा. दिल्ली) हा रिक्षा चालवण्याचे काम करतो. फेसबुकवर त्याने आयपीएस नरुल हसन (बॅच 2015, महाराष्ट्र कॅरेड) नावाने या बनावट नावाने खाते उघडले होते. शिवाय, महाराष्ट्रामध्ये पोलिस अधीक्षक असल्याची माहिती त्याने ठेवली होती. या खात्यावरून त्याने अनेकांशी मैत्री सुरू केली. मात्र, यामध्ये युवतींची संख्या सर्वाधिक होती. फेसबुक फ्रेंड झाल्यानंतर जावेद युवतींसोबत अश्लील चॅटींग करत असे. अधिकारी असल्यामुळे अनेक मुलींनी त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. युवतींसोबत चाटिंग करताना तो नग्न छायाचित्रांची मागणी करत होता. काही युवतींनी त्याच्यावर विश्वास ठेवून नग्न छायाचित्रेही पाठवली. त्याचा मोबाईल तपासला त्यावेळी तो युवतींशी अश्लील चॅट करत असल्याचे दिसून आले. शिवाय, त्याच्या मोबाईलमध्ये युवतींची अश्लिल छायाचित्रेही आढळली. जावेद खरचं आयपीएस अधिकारी आहे का? हे जाणून घेण्यासाठी काही युवती व्हिडीओ कॉल करायच्या. मात्र, तो फोन उचलत नव्हता. अनेक युवतींच्या कुटुंबियांनी त्याच्याशी संपर्क साधून आपल्या मुलीसोबत विवाह करण्याची मागणी त्याच्याकडे केली होती. मात्र, सतत विवाहाची मागणी होऊ लागल्यानंतर तो ते खाते ब्लॉक करत असे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जावेदच्या या प्रकरणाबद्दल त्याच्या पत्नीला माहित होती. तिने पतीच्या मोबाईलमध्ये अनेक युवतींची नग्न छायाचित्रे पाहिली होती. राग आल्यामुळे पाच वेळा मोबाईलही फोडला होता. पतीच्या या सवयीला पत्नी कंटाळली होती. मोबाईलच्या व्यसनापोटी तो काम सोडून दिवस-रात्र चॅटींगच करत बसायचा, असे त्याच्या पत्नीने तपासादरम्यान सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: auto rickshaw drivers implores 3000 girls on facebook