नवी दिल्ली : शिक्षणतज्ज्ञ आणि प्रेरक वक्ते अवध ओझा यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत त्यांनी 'आप'मध्ये प्रवेश केला. केजरीवाल आणि पक्षाचे नेते सिसोदिया यांच्यासोबत अवध ओझा आम आदमी पक्षाच्या कार्यालयात पोहोचले होते. या पत्रकार परिषदेत त्यांनी अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला.