Aviation Safety : विमान सुरक्षा वाऱ्यावर; सरकारी संस्थेतील पाच हजाराहून अधिक पदे रिक्त
Aviation Security: अहमदाबादमधील विमान अपघातानंतर विमान वाहतुकीच्या सुरक्षेवर चर्चा सुरू झाली आहे. सुरक्षेची जबाबदारी असलेल्या सरकारी संस्थांमध्ये पाच हजाराहून अधिक पदे रिक्त असल्याने विमान सुरक्षा धोक्यात आहे.
नवी दिल्ली : अहमदाबादमधील भीषण विमान अपघातानंतर विमान वाहतुकीच्या सुरक्षेशी संबंधित नियमपालन यावर चर्चा सुरू झाली आहे. मात्र विमान वाहतूक, सुरक्षेवर देखरेख ठेवणाऱ्या सरकारी संस्थांमधील तब्बल पाच हजाराहून अधिक पदे रिक्त आहेत.