बेळगाव : अय्यप्पा स्वामींची माळ घालण्यास घरच्यांनी परवानगी न दिल्याने निराश झालेल्या १४ वर्षीय मुलाने आत्महत्या (Child Case) केल्याची हृदयद्रावक घटना रामदुर्ग तालुक्यातील गडद केरी गावात घडली आहे..धरणेश हलगे (वय १४) असं मृत मुलाचं नाव आहे. अय्यप्पा स्वामींचे व्रत करण्याची तीव्र इच्छा असल्याने यंदा आपण माळ घालणार असल्याचे धरणेशने घरच्यांना सांगितले होते. मात्र, तो वयाने लहान असून वसतिगृहात शिक्षण घेत असल्याने कठोर व्रत पाळणे त्याच्यासाठी अवघड ठरेल, असे सांगत आईने त्याला नकार दिला होता..Honor Killing Case : दलित मुलासोबत केला प्रेमविवाह, वडिलांनी सात महिन्यांच्या गर्भवती मुलीची केली निर्घृण हत्या; अंगावर काटा आणणारी घटना.मागील वर्षी धरणेशने आपल्या वडिलांसोबत अय्यप्पा स्वामींची माळ घातली होती. मात्र, दुर्दैवाने त्याच्या वडिलांचे निधन होऊन अजून एक वर्षही पूर्ण झाले नव्हते. यंदाही माळ घालण्याचा त्याचा निर्धार होता. परंतु, शबरीमालाला घेऊन जाण्यास कोणी नसल्याने आणि वय कमी असल्याने माळ घालू नये, असा सल्ला आईने दिला होता..घरच्यांनी व्रत करण्यास परवानगी न दिल्याने मनातून खचलेल्या धरणेशने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला..धरणेशच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. “माळ घालू नको असे सांगितल्यामुळे आमचा मुलगा इतका टोकाचा निर्णय घेईल, याची कल्पनाही नव्हती,” असं सांगत आई हुंदके देऊन रडत होती. या प्रकरणी रामदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.