

Accident
sakal
Ayodhya Pilgrims Vehicle Accident Overview : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे गुरुवारी पहाटे ५ वाजता एक मोठा रस्ता अपघात झाला. अयोध्येला जाणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या बोलेरो वाहनाची ट्रॅक्टर ट्रॉलीशी धडक झाली. यात तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि ११ जण जखमी झाले.
सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. हे भाविक मध्य प्रदेशातील रिवा येथून रामलल्लाच्या दर्शनासाठी बोलेरो गाडीने अयोध्येला जात होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला.
पुरकलंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या कल्याण भदरसा गावाजवळ प्रयागराज महामार्गावर त्यांच्या बोलेरोची ट्रॅक्टर ट्रॉलीशी टक्कर झाली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. स्थानिक रहिवाशांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत.
यापूर्वी, ६ डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात एक मोठा अपघात झाला होता. शनिवारी पहाटे ४ वाजता कुरेभर पोलीस स्टेशन परिसरातील अयोध्या-प्रयागराज महामार्गावरील कुरेभर चौकात भगवान रालल्लाच्या यात्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला एका ट्रकने धडक दिली, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. बसमध्ये महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अंदाजे ४० यात्रेकरू होते. हे सर्व जण अयोध्येत भगवान रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर प्रयागराजला जात होते.