

Hardik Pandya smashes two huge sixes in a single over during the IND vs SA 1st T20 as captured in the BCCI’s viral video.
esakal
हार्दिक पांड्याने केलेल्या स्फोटक फलंदाजीच्या आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या टी-20 सामन्यात तब्बल १०१ धावांनी पराभूत केलं. सुरुवातीचे फलंदाज ढेपाळल्यानंतरही हार्दिकच्या खेळीच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी १७६ धावांचे तगडे लक्ष्य दिले होते. यानंतर भारतीय गोलंदाजांच्या अचूक आणि भेदक माऱ्याने दक्षिणआफ्रिकेला केवळ ७४ धावांपर्यंतच मजल मारता आली.
हार्दिकने मैदानावर उतरताच आपल्या जबरदस्त फलंदाजीच्या कौशल्याचे प्रदर्शन केले. दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज केशव महाराज याच्या षटकातील दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने दोन खणखणीत उत्तुंग षटकार ठोकले आणि केवळ चाहत्यांनाच नाहीतर बीसीसीआय़ला देखील प्रचंड खूश केले आहे. हार्दिकने २५ चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचा स्ट्राइक रेट २०० पेक्षा जास्त होता आणि तो ५९ धावांवर नाबाद राहिला.
तर या सामन्यात हार्दिकने दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजला मारलेल्या दोन खणखणीत षटकरांचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या एक्स हॅण्डलरवर शेअर केला आहे आणि यासोबत, ‘’हार्दिक पंड्याने क्रीजवर त्याचे आगमन झाल्याची स्टाइलमध्ये घोषणा केली.’’ असं देखील म्हटलंय.
हार्दिक पंड्याने या सामन्यात केलेल्या स्फोटक फलंदाजीने पुन्हा एकदाह हे सिद्ध झाले आहे की, जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी तो एक आहे. विशेष म्हणजे २६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध २०२५ आशिया कपच्या सुपर फोर सामन्यादरम्यान हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो बराच काळ खेळण्यापासून दूर राहिला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.