
Supreme Court: अयोध्येतील राम मंदिराच्या जमिनीऐवजी इतरत्र मशीद बांधण्यात येणार आहे. मात्र प्रस्तावित मशिदीचा प्लॅन अयोध्यात विकास प्राधिकारणाने फेटाळून लावला आहे. माहिती अधिकारातून ही माहिती पुढे आलेली आहे. अर्जाच्या उत्तरात विविध शासकीय विभागांकडून मिळणारे ना-हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने मशिदीच्या ले-आऊटचा प्लॅन नामंजूर करण्यात आलेला आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात एक रिपोर्ट प्रकाशित केला आहे.