Ayodhya Ram Janmabhoomi: अयोध्या श्रीराम जन्मभूमी परिसर विभागला जाणार दोन भागांत; काय आहे प्लॅन?
New Multi-storeyed Office and Facility Shift: अयोध्या श्रीराम जन्मभूमी परिसर प्रथमच दोन भागांत विभागण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संरक्षक भिंतीचे काम वेगाने सुरू आहे. नवीन कार्यालय, रस्ता, सुरक्षा आणि पायाभूत सुविधा उभारणीमुळे संपूर्ण परिसराचे स्वरूप बदलत आहे.
अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमीच्या १०८ एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळात पसरलेला परिसर प्रथमच दोन भागांमध्ये विभाजित करण्याची तयारी सुरू झाली आहे. या विभाजनासाठी संरक्षक भिंतीचे (Boundary Wall) बांधकाम सुरू करण्यात आले आहे.