esakal | भारत भक्त...राम भक्तांना PM मोदींकडून कोटी कोटी शुभेच्छा!
sakal

बोलून बातमी शोधा

ayodhya, ram mandir, ram mandir bhumi pujan, pm narendra modi speech

अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण अखेर आपण संकल्प पूर्ण करुन इतिहास रचला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. 

भारत भक्त...राम भक्तांना PM मोदींकडून कोटी कोटी शुभेच्छा!

sakal_logo
By
सुशांत जाधव

सियावर रामचंद्र की जय!... अशा जयघोषात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. जय श्री राम हा गजर फक्त अयोध्यानगरीतच नव्हे तर विश्वभरात दुमदुमत आहे, असे ते म्हणाले. भारत भक्त, राम भक्तांना कोटी कोटी शुभेच्छा! आजचा क्षण प्रत्येकजण भावूक आहे. शतकांची वर्ष कोट्यवधीं लोकांनी पाहिलेल स्वप्न साकार झाले. या क्षणाचा साक्षीदार झाल्याचा अभिमान वाटतो, असे मोदी म्हणाले. राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी बलिदान दिले. राम मंदिर हे आधुनिक प्रतिक असेल. अनेक इमारती नष्ट झाल्या. अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण अखेर आपण संकल्प पूर्ण करुन इतिहास रचला आहे, असे मोदी यावेळी म्हणाले. राष्ट्रीय भावनेच प्रतिक कोट्यवधी सामूहिक संकल्प शक्तींमुळे शक्य झाले. हा संकल्प आपल्याला प्रेरणा युगांतापर्यंत प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. 

राजीव गांधींनी काढलं होतं राम मंदिराचं कुलूप

मोदींच्या हस्ते राम मंदिराचा भूमीपूजन सोहळा पार पडला. अयोध्या नगरीत दाखल झाल्यानंतर मोदींनी सर्व प्रथम हनुमान गढीत जाऊन हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर मोदींनी रामलल्लाची पूजा केली. त्यानंतर त्यांनी राम महिमेविषयी भाष्य केले. जगभरात अनेक देशातील लोक रामाला मानतात. इंडोनेशियातील रामायणाचे पठण केले जाते. मलेशिया, थायलंड, इस्त्रायल, श्रीलंका याठिकाणीही रामाच्या कथा सांगितल्या जातात. यासारख्या  जगभरातील अनेक देशात वेगवेगळ्या रुपात राम आहेत, असे मोदींनी आपल्या भाषणात सांगितले. राम सर्वांचे आहेत. प्रभू रामचंद्रांच्या नावाप्रमाणेच अयोध्येतील भव्य राम मंदिर समृद्ध संस्कृतीचे ध्योतक ठरेल. संपूर्ण मानव जातीला हे मंदिर प्रेरणादायी ठरेल, असेही मोदी म्हणाले.