Ram Mandir Donation: राम मंदिराला ३००० कोटींची देणगी, १५०० कोटी खर्च; जाणून घ्या १८०० कोटींचे गणित काय?
Ayodhya Temple: अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी मिळालेली तब्बल ३००० कोटींची देणगी आणि त्यातील खर्चाचे तपशील जाहीर झाले आहेत. मंदिर बांधकामावर १५०० कोटी खर्च झाले असून, एकूण खर्च १८०० कोटींच्या आसपास राहणार आहे.
रामभक्तांसाठी अयोध्या नगरीतून एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने माहिती दिली आहे की, भगवान श्रीरामांच्या भव्य मंदिराचे बांधकाम आता पूर्णपणे संपन्न झाले आहे.