

Historic Flag Hoisting at Ram Mandir
Sakal
अयोध्या : अयोध्या नगरी पुन्हा एकदा एका ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या थेट देखरेखीखाली २५ नोव्हेंबर रोजी राम मंदिराच्या मुख्य शिखरावर ध्वजारोहणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच मंदिराच्या शिखरावर ध्वज फडकवतील. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील उपस्थित राहणार आहेत.