

Ram Mandir Flag
sakal
उत्तर प्रदेशातील अयोध्या नगरीत आज, मंगळवारी, एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत यांच्या हस्ते श्री रामजन्मभूमी मंदिराच्या शिखरावर औपचारिकपणे भगवा ध्वज फडकवण्यात आला. हजारो भाविक या कार्यक्रमाचे साक्षीदार झाले आणि भगवा ध्वज फडकताच भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला. यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या.