Supreme Court: अयोध्येतील राम मंदिर त्याच जमिनीवर बांधले आहे का? सर्वोच्च न्यायालयात नवी याचिका, उद्या महत्त्वाची सुनावणी

New Petition Filed Over Ayodhya Ram Mandir Land : अयोध्येतील राम मंदिराच्या जमिनीचे स्वतंत्र सर्वेक्षण करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. याचिकेवर २ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
Ayodhya Ram Mandir, where a new Supreme Court petition seeks an independent survey to verify the exact land boundaries and location of the temple

Ayodhya Ram Mandir, where a new Supreme Court petition seeks an independent survey to verify the exact land boundaries and location of the temple

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर ज्या जमिनीवर उभारण्यात आले आहे, तीच जमीन सर्वोच्च न्यायालयाने २०१९ मध्ये दिलेल्या ऐतिहासिक निकालात मंदिरासाठी निश्चित केली होती का, असा प्रश्न उपस्थित करणारी नवी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. या जमिनीची अचूक ओळख, सीमा आणि स्थान निश्चित करण्यासाठी स्वतंत्र सर्वेक्षण करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच या प्रक्रियेसाठी तज्ज्ञांची स्वतंत्र समिती किंवा आयोग स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या याचिकेवर २ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Loading content, please wait...