
Ayodhya
sakal
थंडीच्या दिवसांची सुरुवात झाल्यामुळे अयोध्येतील रामललांच्या दर्शनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आज (गुरुवारपासून) भाविकांना राम मंदिरात सकाळी सात वाजल्यापासून रामललांचे दर्शन घेता येणार आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील. तसेच, रामललांच्या आरतीच्या वेळेतही बदल करण्यात आला असून, दुपारी आरती व नैवेद्यासाठी (भोग) मंदिराचे दरवाजे एक तासासाठी बंद राहतील.
श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने रामललांच्या दर्शनाची ही नवीन वेळ जाहीर केली आहे.