Ram Mandir Flag Ceremony: स्वप्नाची, अखंड प्रयत्नांची पूर्ती; सरसंघचालक भागवत यांची भावना, मंदिरासाठी बलिदान दिलेल्यांचे स्मरण
Mohan Bhagwat Speech: राममंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकताच, शतकानुशतके जोपासलेल्या स्वप्नाची पूर्ती झाल्याची भावना व्यक्त झाली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी बलिदान दिलेल्या साधू-संतांचे स्मरण करून, राममंदिर हे मूल्यांचे प्रतीक असल्याचे सांगितले.
अयोध्या : ‘‘राममंदिराच्या कळसावर भगवा ध्वज फडकविण्यात आल्याने राममंदिराचे बांधकाम औपचारिकरीत्या पूर्ण झाले आहे. या मंदिरासाठी ज्या व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, ते आज नक्कीच समाधानी असतील.