esakal | Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 
sakal

बोलून बातमी शोधा

ayodhya verdict ram mandir will be built on controversial land

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज, अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला. त्यात सुप्रिम कोर्टाने रामलल्ला या हिंदू पक्षकारांचे दावे मान्य केले.

Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागेत राम मंदिर उभारण्याचा मार्ग आज सुप्रिम कोर्टाच्या निकालानंतर मोकळा झाला. अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणात वादग्रस्त 2.77 एकर जागेचे त्रिभाजन करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय चुकीचा असल्याचे सांगत, ही सर्व जागा रामलल्ला पक्षकारांकडे देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुप्रिम कोर्टाने घेतला. 

बाबरी मशिदीच्या जागेत मंदिराचे अवशेष : सुप्रिम कोर्ट

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आज, अयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला. त्यात सुप्रिम कोर्टाने रामलल्ला या हिंदू पक्षकारांचे दावे मान्य केले. त्यात अयोध्येतील वादग्रस्त जागेत प्रभू रामाचा जन्म झाल्याचा दावा सुप्रिम कोर्टाने मान्य केला आहे. 

अयोध्येत मुस्लिमांना पाच एकर पर्यायी जागा देण्याचे आदेश

केंद्र सरकारने रामलल्ला पक्षकारांच्या बाजूने निर्णय देताना, मुस्लिम पक्षकारांना अयोध्येतच पाच एक पर्यायी जागा देण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिला आहे. हिंदू पक्षकारांना देण्यात आलेला 2.77 एकर जागा देताना त्याच्या दुप्पट जागा मुस्लिम पक्षकार सुन्नी वक्फ् बोर्डाला देण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाने या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

मंदिरासाठी ट्रस्ट उभारा
दरम्यान, राम मंदिर उभारणीसाठी ट्रस्ट उभारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या ट्रस्टकडून राम मंदिराचा एक आराखडा तयार करण्याचे आणि तो आराखडा कोर्टात सादर करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टाने सरकारला दिले आहेत.