आयुर्वेदाचा विकास करणे आवश्‍यक;पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन

वृत्तसंस्था
Saturday, 14 November 2020

जामनगरच्या संस्थेला संसदेने एका अधिनियमाद्वारे राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून मान्यता दिली आहे, तर जयपूरमधील संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. 

नवी दिल्ली  - ‘‘भारताला आरोग्य क्षेत्रातील फार मोठा आणि प्रदीर्घ वारसा लाभला आहे हे सिद्ध झालेले सत्य असले तरी हे ज्ञानभांडार शास्त्र - पुराणे आणि आजीबाईच्या बटव्यापुरतेच मर्यादित राहिलेले आहे. या प्राचीन वैद्यकीय ज्ञानाचा आधुनिक आवश्यकतेनुसार विकास करणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केले. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

धन्वंतरी जयंती म्हणजेच धनत्रयोदशीनिमित्त आयुष्य मंत्रालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या राष्ट्रीय आयुर्वेद दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी गुजरातमधील जामनगरच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ टिचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेद (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरच्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एनआयए)चे उद्‍घाटन दिल्लीतून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. जामनगरच्या संस्थेला संसदेने एका अधिनियमाद्वारे राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून मान्यता दिली आहे, तर जयपूरमधील संस्थेला विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठाचा दर्जा दिला आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘बदलत्या काळानुरूप आज प्रत्येक गोष्ट एकात्म पावत आहे व आरोग्यही त्याला अपवाद नाही. ‘ग्लोबल सेंटर ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन’साठी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ने भारताची निवड केली, ही गौरवाची बाब आहे व त्याबद्दल आपण ‘डब्ल्यूएचओ’चे आभार मानतो असे सांगून मोदी म्हणाले की आयुर्वेद हा भारताचा वारसा असून त्याच्या विकासात मानवतेचे कल्याण सामावले आहे. 

आयुर्वेदामुळे अन्य देशही समृद्ध 
आपले पारंपरिक ज्ञान अन्य देशांनाही समृद्ध करीत आहे. ब्राझीलने आयुर्वेदाला आपल्या राष्ट्रीय धोरणात समाविष्ट केले आहे. आपल्या पुरातन आरोग्य प्रणालीला एकविसाव्या शतकातील ज्ञानविज्ञानातून मिळालेल्या मार्गाने आणि एकविसाव्या शतकातील गरजा ओळखून सतत विकसित करत राहावे लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ayurvedic Institute was inaugurated by Prime Minister Narendra Modi through video conferencing