
ayushyman bharat
esakal
एका गरीब कुटुंबात जन्माला आल्यावर सर्वात मोठी भीती असते ती म्हणजे कुटुंबातील कोणी आजारी पडले तर उपचार कसे करायचे? उपचारांसाठी लागणारा मोठा खर्च कुठून आणायचा? पण आता ही चिंता दूर झाली आहे. कारण, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या योजनेने आपल्या स्थापनेची सात वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या सात वर्षांत ही योजना देशातील गरीब, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेने त्यांना महागड्या उपचारांच्या खर्चापासून मुक्त करून, एक सुरक्षित जीवन जगण्याचा मार्ग दाखवला आहे.