Ayushman Bharat Scheme
esakal
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत उपचारांसाठी उपलब्ध असलेल्या ११२ आजारांच्या पॅकेजवर मर्यादा आणण्याची तयारी सुरू आहे. प्रस्तावित बदलानुसार, या आजारांवरील उपचार केवळ सरकारी रुग्णालयांमध्येच उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. त्यामुळे या आजारांवर खासगी रुग्णालयांत आयुष्मान कार्डच्या माध्यमातून उपचार घेणाऱ्या रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.