Azam Khan : मोदी-योगींबद्दलची आक्षेपार्ह विधानं भोवली; आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा

Azam Khan
Azam Khanesakal
Updated on

लखनऊः पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी आणि भडकाऊ भाषणं केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

अनेक प्रकरणांमध्ये दोषी आढळल्यामुळे आझम खान यांची आमदारकी गेलेली आहे. सध्या ते जामिनावर बाहेर होते. रामपूरच्या एमपी-एमएलए कोर्टाने त्यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

Azam Khan
Ashok Chavan Latest News : एकाच उद्योग समूहाला सगळेच प्रकल्प दिले जात असतील तर...; अशोक चव्हाणांची टीका

२०१९च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान आझम खान यांनी भडकाऊ भाषणं केली होती. तत्कालीन व्हीडिओ सर्व्हिलन्स टीमचे प्रभारी (एसडीओ) अनिल कुमार चौहान यांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होती. शिवाय त्यांनी केलेली विधानं सोशल मीडियात व्हायरल झालेली होती.

Azam Khan
Maharashtra Sadan Scam: महाराष्ट्र सदन घोटाळा! छगन भुजबळांची गुन्हा रद्द करण्यासाठी याचिका

आज रामपूरच्या कोर्टाने आझम खान यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. २०१९मध्ये सपा आणि बसपा यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. आझम खान हे निवडून आले मात्र नंतर त्यांची आमदारकी रद्द झाली. रामपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा विजय झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com