पूर्वांचलला माफिया मुक्त केले; अमित शहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूर्वांचलला माफिया मुक्त केले; अमित शहा

पूर्वांचलला माफिया मुक्त केले; अमित शहा

आझमगड : आदित्यनाथ यांनी पूर्वांचलला डास आणि माफियांपासून मुक्त केले आहे. आपण (अखिलेश) तर या ठिकाणी साफसफाई देखील करत नव्हता. सवर्त्र डासांचेच राज्य होते. संपूर्ण पूर्वांचलमध्ये मेंदूज्वराने बालक मृत्युमुखी पडत होते.

मोदी यांच्या स्वच्छता अभियानाला योगी सरकारने प्रत्यक्षात आणले आणि पूर्वांचलला डासमुक्त केले, अशा शब्दात गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या कामाचे कौतुक केले. आझमगड हा अखिलेश यादव यांचा गड मानला जातो. याचा संदर्भ घेत शहा म्हणाले की, आझमगडला ‘सप’च्या काळात कट्टर विचारसरणी व दहशतवाद्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखले जात होते.

त्याच भूमीत आता माता सरस्वतीची उपासना केली जात आहे. देशविरोधी कारवायांसाठी आझमगड हा अड्डा बनला होता. त्याच ठिकाणचे युवक आता शिक्षण घेऊन देशाच्या विकासकामाला हातभार लावत आहेत, असे शहा म्हणाले.

loading image
go to top