B. Sudershan Reddy: बिहारला वाचविणे आवश्यक: बी. सुदर्शन रेड्डी
Bihar Politics: उपराष्ट्रपती पदाच्या प्रचारार्थ बिहारमध्ये आलेल्या बी सुदर्शन रेड्डी यांनी राज्याचे रक्षण करण्याची गरज अधोरेखित केली. इंडिया आघाडीच्या पक्षांसह अनेकांनी त्यांना पाठिंबा दिला.
पाटणा : महात्मा गांधी आणि राममनोहर लोहिया यांची कर्मभूमी असलेले बिहार राज्य सध्या धोक्यात असून त्याला वाचविणे आवश्यक आहे, असे मत इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी गुरुवारी व्यक्त केले.